शिराळा (विनायक गायकवाड) : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणार चांदोली राष्ट्रीय उद्यान पुढील आदेश येई पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहील, अशी माहिती वनक्षेत्रपाल गोविंद लंगुटे यांनी दिली.
ते म्हणाले पर्यटकांची काळजी, जमावबंदी, संचारबंदी आदेश तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घालुन दिलेल्या नियमांचे पालन करत बुधवार दि. ७ एप्रिल पासुन चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.
0 Comments