Daily Mahasatta

Daily Mahasatta

हॉटेल व्यावसायिकांसाठी निर्बंध काळात वेळ वाढवून द्या : पृथ्वीराज पाटील

सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रश्नावर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना नुकतेच निवेदन सादर केले.

सांगली, (प्रतिनिधी)
कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीतील निर्बंधामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून त्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना मुंबईत दिले आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे सरकारने जमावबंदीसह काही निर्बंध लागू केले आहेत, परंतु या निर्बंधामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे, त्याकरिता व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा खाद्य विक्रेता मालक - चालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. पृथ्वीराज पाटील यांच्याकडे केली आहे, तसेच यासंदर्भात शासनाकडे आपण दाद मागावी अशी विनंतीही केली आहे, त्यानुसार श्री. पाटील यांनी बुधवारी मुंबईत ना. वडेट्टीवार यांची भेट घेतली आणि या व्यावसायिकांच्या तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत चर्चा केली.

या जाचक निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांसाठी सुविधा देता येत नाहीत, त्यामुळे ग्राहक कमी झालेला आहे. हॉटेल व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे, त्यांना पगार द्यावा लागतो, बँकांची कर्जे काढून हा व्यवसाय चालवलेला आहे, त्यामुळे खुप मोठे नुकसान सोसावे लागत आहे, व्यवसायासाठी सध्याचा वेळ फारच अपुरा आहे, त्यामुळे तो वाढवून दिला पाहिजे, असे श्री. पाटील यांनी ना. वडेट्टीवार यांना पटवून दिले. नाम. वडेट्टीवार यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------


Post a Comment

0 Comments