Daily Mahasatta

Daily Mahasatta

साहेबांचा आदेश आला आणि विट्यात कार्यकर्त्यांनी केली जय्यत तयारी

विटा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या भीषण संकटात राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करावी, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. साहेबांच्या आदेशानुसार विटा नगरपरिषदेच्या खुले नाट्यगृह येथे रविवार दि 18 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांनी दिली आहे. 

अॅड वैभव पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आरोग्य विभागाची माहिती घेतली असता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे असे त्यांना जाणवले. या अनुषंगाने साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष नाम. जयंत पाटील यांनी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांना सूचना दिल्या. यालाच प्रतिसाद म्हणून खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विटा नगरपरिषदेच्या खुले नाट्यगृह येथे रविवार दि 18 रोजी सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे

तरी मी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करतो कि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाचा आदर करावा आणि महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन युवा नेते वैभव पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments