Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर स्मशानभूमीतील 'कोव्हीड योद्धांना' मुख्याधिकारी अरविंद माळी यांची कौतुकाची थाप

इस्लामपूर, (हैबत पाटील) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नेहमीच सतर्क आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कामाचा ठेका दिलीप सावंत यांना देण्यात आला आहे. सावंत आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम प्रामाणिक करत आहेत अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

दिलीप सावंत हे प्रशासनाने दिलीप सावंत स्वतः स्मशानभूमीत मुक्कामाला राहून ते जे काम करत आहेत, त्या कामाची तुलना इतर कशाबरोबर होऊच शकत नाही. स्मशानभूमी व त्याशी संबंधित सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या जावू नयेत, याची काळजी घ्यावी आणि काहीही शंका असली तरी प्राधान्याने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

श्री. माळी म्हणाले, " पालकमंत्री व जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत ठरल्यानुसार त्यांनी केलेल्या सूचना अमलात आणल्या जात आहेत. शहरात सध्या २६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. पालिकेने त्यांच्या घरावर स्टिकर चिकटवून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. तरीही हे लोक बाहेर पडतात, अशा काहींच्या तक्रारी आहेत. त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका विचारात घेऊन प्रभागनिहाय उपाययोजना सुरू केल्या आहेत. १४ प्रभागासाठी ३ नियंत्रक तर प्रत्येक प्रभागात २ कर्मचारी रुग्णांचा दैनंदिन आढावा घेण्याचे काम करत आहेत. आंबेडकरनगर आरोग्य केंद्रातून आशा वर्करकडून रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांना समाजकल्याण विभागाच्या कोविड केंद्राच्या ठिकाणी हलवले जाईल. ५ पेक्षा जास्त रुग्ण असतील तर ती गल्ली सील केली जाईल आणि कंटेन्मेंट झोन केले जातील. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळावेत. मागील मार्च महिन्यात फक्त १ मृतदेह होता तर गेल्या २६ दिवसात ७४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये इस्लामपूर शहरातील १०, सांगली जिल्ह्यातील २७ व जिल्ह्याच्या बाहेरील ३७ जणांचा समावेश आहे. 

इस्लामपूर शहरात एकूण ३२२ रुग्ण आहेत. त्यापैकी होम आयसोलेशनमध्ये २६६ रुग्ण तर कोव्हिड सेंटरमध्ये १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात ५ तर खासगी रुग्णालयात ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडमुळे शहरातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे.कापुसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेहांची वाढती संख्या विचारात घेता शहरात दुसरीकडे स्मशानभूमी सुरू करण्याची मागणी होत आहे,त्याचा विचार सुरू आहे. गैर प्रकार होऊ नयेत यासाठी स्मशानभूमीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. गाफीलपणा झाल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल. प्रशासनाला सहकार्य करावे, काही गैर प्रकार निदर्शनास आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments