Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवभोजनच्या सेवेतून मिळणाऱा आनंद वेगळा : माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा सोनटक्के

शिराळा (विनायक गायकवाड) : शिवभोजन थाळी मुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद याचे आपण शब्दात मोल करू शकत नाही. या सेवेतून मिळणारे समाधान वेगळेच असल्याचे मत माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा सोनटक्के यांनी व्यक्त केले.

हनुमान जन्मोत्सव निमित्त शिवभोजण थाळी लाभार्थ्यांना नेहमीच्या जेवणासोबत खीर वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पुरवठा अधिकारी व्ही. डी. बुरसे प्रमुख उपस्थित होते.

माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा सोनटक्के म्हणाल्या, आज हनुमान जयंती निमित्त सर्व शिवभोजन लाभार्थ्यांना गव्हाची खीर देण्यात आली. या अगोदर दसरा सणानिमित्त पुरणपोळीचा आस्वाद सर्वाना देण्यात आला होता. त्याचबरोबर दिवाळीला फराळ, रामनवमी निमित्त सुद्धा खिरीचा प्रसाद देण्यात आला होता. शासनाने गरीब व गरजू लोकांसाठी ज्या हेतूने ही शिवभोजन थाळी चालू केली ती खरच खूप गरजेची आहे व त्याचा लाभ या लोकांना देताना त्यांच्या चेहऱ्यावर जो भाव दिसतो तो शब्दात सांगायचे झाले तर आपल्याला काही शब्दच मिळणार नाहीत.

शिवभोजन थाळी सुरू झालेपासून आम्ही थाळी लाभार्थ्यांकडून शासनाने यापूर्वी ठरवून दिलेले नाममात्र शुल्क देखील घेत नव्हतो. समाजातील दानशूर मंडळींना विनंती करून यापूर्वीचे प्रत्येक थाळी मागे येणारे ५ रुपये हे शुल्क दररोज दिवस ठरवून देऊन जितक्या थाळी होतील त्या प्रमाणे घेत होतो. या सत्रात तर शासनाने मोफतच शिवभोजन थाळी देऊ केली आहे. लाभार्थ्यांना जेवणामध्ये दूजाभाव न करता आम्ही आमचे घरचे सदस्य मानूनच हे काम एक सेवा म्हणून करत आहोत. याकरिता अनेकांचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, केंद्र चालक आशा साळुंखे, सुनंदा म्हेत्रे यांचेसह सर्व शिवभोजन लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments