Daily Mahasatta

Daily Mahasatta

गुढीपाडवा ; जिल्हाधिकारी यांच्या महत्वपूर्ण सुचना

सांगली (प्रतिनिधी) : कोरोनाच्या अभूतपूर्व महामारीला रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे पालन करून साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

गेल्यावर्षी राज्यात कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन आजपर्यत झालेले सर्व सण/उत्सव हे अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न जमता साजरे केलेले आहेत. सध्या कोरोना संसर्गाच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा हा सण कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापुर्वी साजरा करणे अपेक्षित आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करुन तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असतो. 

कोविड-19 या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्याच्या दृष्टीने यावर्षी गुढीपाडण्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याएवेजी आता सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा. 
गुढीपाडवा सणादिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments