Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुस्लिम समाजाने उभारलेले कोव्हीड सेंटर राज्यात आदर्श : पालकमंत्री जयंत पाटील

इस्लामपूर (हैबत पाटील) : मुस्लिम समाजाने लोक वर्गणीतून सुरू केलेले कोव्हिड केअर सेंटर कोव्हिड रुग्णांना चांगली सेवा देईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाने लोक वर्गणीतून कोव्हिड केअर सेंटर सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चांदतारा मदरसामध्ये इस्लामपूर मुस्लिम समाज मेडिकल सेंटरच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे नाम. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी धनंजय देशमुख, तहसिलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, उप नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, अॅड. चिमणभाऊ डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

नाम. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी कोरोना संकटाची तीव्रता वाढल्या नंतर मुस्लिम समाजाने लोक वर्गणी तून केअर सेंटर सुरू करून कोव्हिड रुग्णांची चांगली सेवा केली आहे. यावर्षीही आपण पुन्हा हे सेंटर सुरू केले आहे. यावर्षीही आपल्याकडून कोव्हिड रुग्णांची चांगली सेवा होईल. हाफिज जावेद यांनी समाजाच्या कार्यासाठी मदरसा इमारत देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Post a Comment

0 Comments