Daily Mahasatta

Daily Mahasatta

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर : शिवाजीराव नाईक.


शिराळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीसाठी सुमारे सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली आहे.

शिराळा ( विनायक गायकवाड)
आम्ही लोकप्रतिनिधी असताना वारंवार मागणी व पाठ पुरवठा केल्यामुळे शिराळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीसाठी सुमारे सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले, शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. आम्ही वेळोवेळी लक्ष घालून या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी झालो आहे त्यानुसार बहुतांशी शासकीय कार्यालये सुसज्ज आणि नवीन इमारतीमध्ये आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे कामकाज अपुर्‍या जागेत चालते. येथील कर्मचारी, अधिकारी यांना व्यवस्थितपणे सुसज्ज जागेमध्ये काम करता यावे यादृष्टीने आम्ही मंत्रालयीन स्तरावर आणि त्याचबरोबर अधीक्षक अभियंता कार्यालय कोल्हापूर, मुख्य अभियंता कार्यालय पुणे यांच्याकडे सातत्याने शिराळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय व्हावे यासाठी आग्रही होतो. त्यानुसार नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या इमारतीकरिता सुमारे सव्वा दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

सदर इमारत बांधण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वतःची जागा उपलब्ध आहे. नजीकच्या काळात याबाबतची इमारत रचना, निविदा प्रक्रिया यासारख्या बाबी पूर्ण होऊन प्रत्यक्षात इमारत बांधकामाची सुरुवात होईल. त्यामुळे इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची इमारत देखणी आणि सुसज्ज होईल. जेणेकरून येथील कर्मचारी, अधिकारी यांना सुसज्ज जागेमध्ये काम करणे सोपे होईल. शासकीय इमारतींच्या दृष्टीने या नवीन आणि सुसज्ज इमारतीमुळे शिराळा तालुक्याच्या वैभवात भर पडेल.

Post a Comment

0 Comments