Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस पोलीसांची धडाकेबाज कारवाई

पलुस (अमर मुल्ला) : कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता सांगली जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापना बंद करणे , तसेच संचारबंदी व जमावबंदी, विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबूले, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात पलुस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या पलूस तालुक्यातील 25 आस्थापनान वर गुन्हे दाखल केले.

हॉटेल अनिता , चौधरी बंधू बेकरी, बालाजी बेकरी, न्यू सुपर जेंट्स पार्लर , महादेव गारमेंन्ट, फ्रेंड्स मोबाईल शॉपी ,अनिल पान शॉप, प्रगती टेलर आणि पान शॉप, हॉटेल हौसाई , नितीन दिनकर संकपाळ, दिनकर तुकाराम संकपाळ , लकडे मेडिकल , लक्ष्मी दूध डेअरी , राजेंद्र किराणा स्टोअर्स , प्रतीक मिल्क शॉपी , शहा किराणा स्टोअर्स ,सुरभी चायनीज फास्ट फुड सेंटर , होमकर साडी व कापड दुकान , शहा किराणा स्टोअर्स , रामराव बाबुराव खाडे , श्रमिक सहकारी ग्राहक भांडार , शिवम एडीगेटर , सद्गुरु पान शॉप , पंचतत्व कृषी उद्योग समूह व चौधरी स्विट मार्ट यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments