Daily Mahasatta

Daily Mahasatta

जि.प. शाळा टिकवणे आवश्यक : गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर

शिराळा (विनायक गायकवाड) : जिल्हापरिषद शाळा टिकल्या तरच गोरगरीब व सर्वसामान्यांची मुले शिकतील, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थनगर, आरळा, जि.प. शाळा इनामवाडी व येसलेवाडी येथील इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेश संदर्भात पालकांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ते बोलत होते.

प्रदीप कुडाळकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत दर्जेदार काम चालू आहे. या शाळांतील शिक्षकांनी शाळांचा चांगल्या प्रकारे कायापालट केला आहे. विद्यार्थाना त्याचा उपयोग होईल. केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या, गटविकास अधिकारी अनिल बागल व गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहीलीमध्ये ऑनलाईन विद्यार्थी दाखल करावयाचा उपक्रम प्रभावीपणे तालुक्यात सुरू आहे.

यावेळी उपसरपंच सदाजी पाटील, अध्यक्षा नेत्रा झाडे, बुधाजी झाडे, सिद्धार्थनगर शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार , शिक्षिका शुभांगी पवार, इनामवाडीच्या मुख्याध्यापिका पुनम मसुटगे, लताराणी पाटील, येसलेवाडीचे मुख्याध्यापक जितेंद्र परदेशी, विलास कराळे यांच्यासह अन्य शिक्षक व पालक ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments