Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात १०९० उच्चांकी कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज मंगळवार ता. २० रोजी दिवसभरात जिल्ह्यात १०९२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आज मंगळवार ता. २० रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील १०९० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे.

आज सांगली जिल्ह्यातील १९ जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर ३६७ जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १०५ , जत १०२, कडेगाव ८०, कवठेमंहकाळ ५९ , खानापूर ९२, मिरज १४५, पलूस ५६ , शिराळा ५३ , तासगाव ९८, वाळवा ९७ तसेच सांगली शहर १३५ आणि मिरज शहर ६८ असा सांगली जिल्ह्यातील १०९० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ८ हजार ३३१ रुग्ण उपचाराखाली आहेत.

Post a Comment

0 Comments