Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात मृत्यूचे थैमान, नागरिकांनो व्हा सावधान...!!

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांचा दररोज नवीन उच्चांक होत असताना दुसरीकडे मृत्यूचे थैमान देखील सुरु आहे. आज शुक्रवार ता. २३ रोजी जिल्ह्यात १ हजार ३०९ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर सर्वाधिक २८ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील ७ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. 

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन असला तरी सकाळी ७ ता ११ या वेळेत सुट असल्याने हजारो नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकांना ऑक्सिजन बेडच नव्हे तर स्मशानभूमीत देखील रांगा लावावी लागत आहे. पण सामान्य नागरिक किंवा ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण नाहीत असे सर्वच लोक बेफिकीरीने वागत आहेत. भाजीपाला, बेकरी, वडापाव पासून ते जिलेबीच्या गाड्यांवर मोठी गर्दी होत आहे. आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोरोनाला खतपाणी घालत आहोत, याची जाणीव देखील लोकांना नाही. 

आज दिवसभरात १ हजार ३०९ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दुसरीकडे एकाच दिवशी जिल्ह्यातील २८ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. विशेष म्हणजे खानापूर तालुक्यात दररोज सरासरी ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत होता. आज यामध्ये वाढ होऊन एकाच दिवशी ७ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट आणि मृत्युचा तांडव सुरु झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. 

आज सांगली जिल्ह्यात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १८९ , जत ५५, कडेगाव १५४ , कवठेमंहकाळ ८९ , खानापूर ८०, मिरज १७६, पलूस ७५ , शिराळा ७२ , तासगाव ९१ वाळवा १३८, तसेच सांगली शहर ९५ आणि मिरज शहर ९५ असा सांगली जिल्ह्यातील १ हजार ३०९ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या १० हजार ५०९ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात ५५० रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. सद्या १ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments