Daily Mahasatta

Daily Mahasatta

...अन्यथा उद्रेक होईल ; संग्रामसिंह देशमुख यांचा इशारा

कडेगाव ( सचिन मोहिते )
सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व व्यापार्‍यांच्यातून असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने सर्व व्यापार्‍यांना नियम, अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल असे मत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त केले.

संग्राम देशमुख म्हणाले, सरकारने जो जीआर पारित केला आहे. त्याबद्दल सर्वांच्यातच संभ्रमावस्था आहे. प्रशासन जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास व्यापार्‍यांना भाग पाडत आहेत. सरकारने शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकडाऊन आणि इतर दिवशी नियम व अटीनुसार दुकाने सुरू, असा निर्णय योग्य घेतला आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद हा निर्णय चुकीचा आहे. तसा आदेशही नसताना प्रशासन जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास सांगत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी शनिवार, रविवारचा अल्टीमेट सोडून इतर दिवशी दुकाने सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.

सध्या कोरोनामुळे गेली १४ महिने झाले कडेगाव व पलुस तालुक्यातील छोटे मोठे व्यापारी हे आर्थिक अडचणीत आले आहे, आर्थिक देणी थांबली आहेत. बँकाची कर्जे आर्थिक वर्षात वेळेवर गेली नाहीत. तसेच सलुन, इस्त्री, दुचाकी व चारचाकी गँरेजधारक, पानपट्टी, छोटे मोठे हाॅटेल व्यवसायिक यांचा उदरनिर्वाह हा रोजचा धंदा व व्यवसायावर असतो.

यामुळे पुर्णपणे बंद ठेवला तर हे घटक अडचणीत येतात. यामुळे पुर्णपणे लाॅकडाऊन यास आमचा विरोध आहे. व्यापारी व छोटे व्यवसायिक यांना शासनाच्या नियमावलीनुसार आपला व्यवसाय सुरू ठेवतील व आपला उदरनिर्वाह करतील. नाही तर छोटे व मोठे व्यवसायिक अडचणीत येतील. अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे हाल सुरू आहेत. सुरुवातीला दोन दिवस वगळता सवलत दिली. मात्र पुन्हा सवयी प्रमाणे यु टर्न घेतला गेला आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून सर्व परिस्थिती हाताळावी अशी मागणी देशमुख यांनी केली.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. राजाराम गरूड, कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष मा. धनंजय देशमुख (भैय्या), पलूस तालुका भाजपा अध्यक्ष मा. विजय पाटील (काका), पलूस पं. स. सभापती मा. दिपक मोहिते, कडेगाव पं. स. सभापती सौ. मंगलताई क्षीरसागर, नगरसेवक मा. निलेश येसुगडे, भाजपा प्रदेश चिटणीस ओबीसी मोर्चा मा. प्रकाश गडळे, कडेगाव नगरपंचायत गटनेते मा. उदय देशमुख, नगरसेवक मा. कपिल गायकवाड, नगरसेवक मा. दिलीप जाधव मा. कडेगाव पं. स. मा. उपसभापती मा. रवी कांबळे, जेष्ठ नेते मा. बुचडे काका, मा. संतोष डांगे, मा. संजय पाटील (सूपनेकर दाजी), उद्योजक मा. सुनील गाढवे, मा. प्रकाश तडसरे, मा. संभाजी देसाई, मा. संदीप साळुंखे, मा. प्रकाश गायकवाड, मा. प्रतीक भस्मे, मा. सुरज ओसवाल शेठ, मा. कीर्ती शेठ भंडारी, मा. दादा गायकवाड, मा. इम्तियाज शेख मा. सचिन जगताप, मा. सूर्यकांत खाडे, कडेगाव तालुका नाभिक संघटना अध्यक्ष मा. संभाजी जाधव, मा. रवी पवार, सर्व व्यापारी संघटना व पलूस - कडेगांव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments