Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेठरेहरणाक्ष येथे आरोग्यसेवा वाहन लोकार्पण सोहळा

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे ) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने रेठरेहरणाक्ष येथील पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेने गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा वाहन लोकवर्गणीतून त्याचा लोकार्पण सोहळा उद्योगपती व समाजसेवक सर्जेराव यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन सहा. गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी वैभव कांबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी इस्लामपूर व श्री बुधावले,बाल विकास प्रकल्प अधिकारी करवीर तालुका आणि अर्थक्रांती कडेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील उर्फ फडणीस, सरपंच कुमार कांबळे उपस्थित होते.

श्री यादव म्हणाले, तुम्ही करत असलेले हे काम निरपेक्ष हेतूने, जेष्ठांसाठी करत आहात. त्यामुळे आपण तुमच्या वाचनालयासाठी ही मी मदत करणार आहे. प्रत्येक गांवात आरोग्यसेवा वाहन असायला हवे, ज्यामुळे सर्वसामान्य , गरीब लोकांना कठीन प्रसंगी मोठा आधार ठरेल व लोकांना कमी खर्चात हॅास्पिटलनध्ये जाता येईल.. 

जगन्नाथ मोरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी गावात कोरोना काळात वाडी वस्त्यांवर केलेली औषध फवारणी , कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची दोन मोठी सिलेंडर दिलेले आहेत. तसेच युज अँड थ्रो ची पन्नास गॅस सिलेंडर दिलेले आहेत . तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा अडचणी मांडल्या अर्थक्रांती याविषयी सविस्तर माहिती दिली व जेष्ठांना सन्मानधन मिळाले पाहिजे, ॲट्रॉसिटी सारखा कायदा त्यांच्यासाठी झाला पाहिजे. तालुकाआरोग्य केंद्र तयार केली पाहिजेत अशा मागण्या मांडल्या. डी के मोरे यांनी पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था गावात छोटी-मोठी कामे करीत आहे व त्यासाठी आम्हास आपण मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. चंद्रशेखर मोरे यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

यावेळी निवास शिंदे, किसन सावंत, एन डी माने, निवृत्ती पवार, बाळासो मदने, शहाजी सत्रे, वसंत पवार, पोपट बेले, भास्कर बेले, विलास माळी, मोहन काळे, बाळासो कांबळे, दीपक गुरव, दादासो कोळेकर, नितीन शिंदे, हुसेन अकोळकर, संपतराव शिंदे, दिनकर पवार, हिराबाई घेवदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments