Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : तहसीलदार शिंदे

शिराळा / प्रतिनिधी
सर्वाना समान न्याय दिला जाणार असल्याने जे लॉक डाऊनचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिला आहे. येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात विकेंड लॉक डाऊनच्या पार्श्व भूमीवर आयोजित बैठकीत बोलत ते बोलत होते.

यावेळी बोलताना तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने लॉकडाउनच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह, दोन खासगी रुग्णालय असे मिळून ३७ ठिकाणी लसीकरणची सोय करण्यात आली आहे. लसीबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. शासकीय नियमानुसार ४५ वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी.

कोरोनचा वाढता प्रसार पाहता विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे. या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. सर्वाना समान न्याय दिला जाणार असल्याने जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. रिक्त जागेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने छोटे व्हेंटिलेटर सुरू राहतील. लस संपली असून दोनच दिवसात ती पुन्हा उपलब्ध होईल.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, तालुक्यात २२ हजार लसीकरण झाले आहे. शिराळा शहरात २ हजार लसीकरण झाले आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. आज अखेर तालुक्यात ९७ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सर्वांनी खबरदारी घेऊन आजारी पडल्यास वेळीच औषधोपचार करून घ्यावा.

यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील, व्यापारी महासंघाचे विश्वास कदम, नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक, उत्तम डांगे, नगरसेविका नेहा सूर्यवंशी, सीमा कदम, अमोल पारेख, वसंत कांबळे, किशोर यादव, उमेश कुलकर्णी, राहूल भुरके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments