Daily Mahasatta

Daily Mahasatta

शाळांच्या पट वाढीसाठी वाळवा पंचायत समितीचा आदर्श उपक्रम

वाळवा (रहिम पठाण) : वाळवा पंचायत समिती मार्फत भवानीनगर केंद्रातील सर्व पालक,सरपंच,मुख्याध्यापक यांची संयुक्त मिटींग मा. गटशिक्षण अधिकारी श्री. प्रदीपकुमार कुडाळकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदरची मिटींग ही पंचायत समिती सदस्या सौ. रुपालीताई सपाटे यांच्या सूचनेनुसार आॕनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक केंद्र व शाळानुसार पालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे यासाठी सौ सपाटे यानी पुढाकार घेतलेला आहे.
दिनांक 10 एप्रिल रोजी भवानीनगर केंद्रातील सर्व पालकांना मुलांना जि. प. शाळेत घालण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांची माॕडेल स्कूलची संकल्पना ही यावेळी स्पष्ट केली. इतर ही शासन स्तरावरील योजनांचे फायदे ही त्यांनी सांगितले. ज्या गावातील मुल 100% जि. प. शाळेत येतील त्यांचा योग्य सन्मान करण्याचे आश्वासन यावेळी पालकांना संबोधन करताना त्यांनी दिले आहे.

भवानीनगर शाळेतील वाढती पटसंख्या व उत्कृष्ट पटनोंदणी बाबत सर्व टिमचे अभिनंदन त्यांनी केले. विद्यमान सरपंच मा. राजेश कांबळे यानी शाळेची यशोगाथा मिटींगध्ये सांगितली.

यावेळी भवानीनगर केंद्रप्रमुख सौ. शोभा खवरे यांनी ही मार्गदर्शन केले. प्रास्तविक मा. सतिश पोखर्णीकर सरांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मा. गिरीश मोकाशी जि.प. शाळा दुधारी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments