Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाला 'ब्रेक'

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. गेल्या सात दिवसात सुमारे १३०० इतका रुग्णांचा सरासरी आकडा असून हा आकडा स्थिरावला आहे. एवढेच नव्हे तर आज शुक्रवार ता. ३० रोजी एकाच दिवशी १०१६ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. 

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फ़ोट आणि मृत्यूची वाढ यामुळे प्रशासन हादरुन गेले होते. मात्र गेल्या सात दिवसात कोरोना रुग्णांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागून हा आकडा १३०० च्या आसपास स्थिरावला आहे. यादरम्यान रुग्ण बरे होण्याच्या संख्येत देखील कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

आज शुक्रवार ता. ३० एप्रिल रोजी १२८० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक २२५ रुग्ण जत तालुक्यातील आहेत. सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : आटपाडी - १६०, जत- २२५, कडेगाव- २७ कवठेमंहकाळ - ६०, खानापूर -१००, मिरज- १४२, पलूस -१९, शिराळा -२६, तासगाव-११६, वाळवा-२०२, तर महापालिका क्षेत्रात सांगली शहर १३२ आणि मिरज शहर ७१ असे सांगली जिल्ह्यातील १२८० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

आज एकाच दिवशी १०१६ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. तर ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments