Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत जलनिःसारण समस्या सोडविण्यासाठी अत्याधुनिक मशिन दाखल

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील जलनि:सारण समस्या सोडविणेकामी आत्याधुनिक पध्दतीचे सक्शन कम जेटींग मशीन विथ वॉटर रिसायक्लर वाहन मनपा सेवेत दाखल झाले आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका जलनिःसारण विभागामार्फत पुढील दोन वर्षे 
कालावधीकरीता भूमीगत गटर योजनेच्या पाईप-लाईन चोकअप काढणे, लाईन साफ करणे, दैनंदिन देखभाल करणेकामी आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांचे मान्यतेने आर्यन पंप पुणे यांचेकडून सक्शन कम जेटींग मशीन वीथ वॉटर रिसायक्लर वाहन भाडेतत्वावर घेण्यात आले आहे. आज दि. ०१ एप्रिल रोजी महापौर श्री. दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते व उपमहापौर श्री. उमेश पाटील, सभापती स्थायी समिती श्री. पांडुरंग कोरे, मा. विरोधी पक्ष नेते श्री. उत्तम साखळकर, गटनेते श्री. विनायक सिंहासने, सभापती महिला व बाल कल्याण समिती सौ. गितांजली ढोपे-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी अधिकारी व कर्मचारी तसेच कंपनीचे प्रतिनिधी श्री. विक्रम गायकवाड व भागातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments