Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाने ४६ रुग्णांचा बळी, हाॅस्पीटल फुल्ल

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा कहर सातत्याने सुरुच असून आज उपचारादरम्यान ४६ रुग्णांचा बळी गेला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ३३ आणि अन्य जिल्ह्यातील १३ मृतांचा समावेश आहे. तर आज दिवसभरात १ हजार १५० रुग्णांचा नवीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांचा दररोज नवीन उच्चांक होत असताना दुसरीकडे मृत्यूचे थैमान देखील सुरु आहे. आज रविवार ता. २५ रोजी जिल्ह्यात १ हजार १५० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर सर्वाधिक ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील ७ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. 

आज सांगली जिल्ह्यात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १२१ , जत १०४, कडेगाव ६७ , कवठेमंहकाळ ७१ , खानापूर १४३, मिरज १६६, पलूस १७ , शिराळा २३ , तासगाव ११० वाळवा ६८, तसेच सांगली शहर १८६ आणि मिरज शहर ७४ असा सांगली जिल्ह्यातील १ हजार १५० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ११ हजार ३७८ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात ७४९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. 

Post a Comment

0 Comments