Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाचा महाविस्फोट, खानापूर तालुक्यात १७९ पाॅझिटीव्ह

विटा (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील आज मंगळवार ता. २७ रोजी कोरोनाचा महाविस्फोट झाला असून तालुक्यात एकाच दिवशी १७९ इतके विक्रमी रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. 

आज तालुक्यात हिंगणगादे गावात सर्वाधिक १७ आणि घानवड- १४, हिवरे-१४, पळशी -१०, असे रुग्ण आढळून आले आहेत. एका बाजूला शहरी भागातील रुग्ण संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.

आज खानापूर तालुक्यात गावनिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : विटा- ८, कुर्ली- ७, ऐनवाडी ७, आळसंद ७ , घानवड १४, पारे ५, घाडगेवाडी ६, मंगरूळ ६, मेंगणवाडी १, पळशी १०, गोरेवाडी १, अडसरवाडी १, बलवडी खा. २, हिवरे १४, रेणावी २, घोटी २, खानापूर ४, बेनापूर ५, वलखड-६, नागेवाडी ९, हिंगणगादे १७, भाग्यनगर १, लेंगरे ६, वेजेगाव -३, गार्डी -६, भाळवणी ४, कळंबी-४, पंचशील नगर -१ , ढवळेश्वर-२, भूड - १, सांगोले -२, शेंडगेवाडी -१, भडकेवाडी १, माहुली-२, साळशिंगे-१, ताडाचीवाडी -४ आणि करंजे -१ असे तालुक्यात १७९ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments