Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिका क्षेत्र कोरोना चा नवा हाॅटस्पाट : दिवसभरात १५८ कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून सांगली महापालिका क्षेत्र आता कोरोनाचा हाॅटस्पाट ठरले आहे. आज सांगली शहरात १११ तर मिरज शहरात ४७ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यात देखील आज ४११ इतके सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका क्षेत्रात दररोज शंभर नवीन रुग्णांची भर पडत होती. आज यामध्ये वाढ होऊन आज १५८ रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी १६ ,जत २७ कडेगाव १८ कवठेमंहकाळ १२, खानापूर ३४, मिरज २८, पलूस २५, शिराळा १२, तासगाव २० , वाळवा-६१, तसेच सांगली शहर १११ तर मिरज शहर ४७ असे जिल्ह्यात एकूण ४११ इतके रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments