Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना : विटा शहर हादरले, नागरिकांनो घरातच रहा..!

विटा (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज शनिवार ता. १७ रोजी विटा शहरात २६ तर खानापूर तालुक्यात आज ७६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा आणि दवाखाने फुल्ल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काही दिवस घरातून बाहेर न पडणे हाच कोरोना वरील मुख्य उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

आज दिवसभरात तालुक्यात ७६ इतके उच्चांकी कोरोना बाधित आढळून आले आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक आणि प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आता शासनाच्या नियमाचे पालन करत संपूर्ण लाॅकडाऊन कडक पाळणे आवश्यक आहे.

आज खानापूर तालुक्यात गावनिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : विटा २६, रेणावी २, खंबाळे ३, कार्वे २, ढवळेश्वर १, नागेवाडी ५, चिंचणी २, साळशिंगे १, वेजेगाव १ , चिखलहोळ ५, माहुली १, देवीखिंडी २,लेंगरे १, भूड १, कळंबी ७, पारे ३, गार्डी २, बेणापूर २, जाधववाडी ३, करंजे ५ आणि भाग्यनगर २ असे एकूण ७६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

Post a Comment

0 Comments