Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील मुख्य कोव्हीड योद्धा पाॅझिटीव्ह

विटा (प्रतिनिधी)
खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे आणि त्यांच्या पत्नी प्राचार्या चंदना लोखंडे यांच्यासह तालुक्यातील १७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती स्वतः तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे हे गेल्या वर्षापासून कोरोनाच्या लढाईत तालुक्याचे नेतृत्व करत आहेत. तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम केले. शासनाचे नियम आणि माणुसकीची सांगड घालणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्याच कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाला हादरा बसला आहे.

आज दिवसभरात विटा शहर ७, पारे ६, गार्डी १, ताडाचीवाडी १, लेंगरे १ आणि बलवडी खा. १ असे एकूण खानापूर तालुक्यात १७ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सद्या २२७ रुग्ण उपचाराखाली आहेत.
------------------------
कोव्हीड योद्धा पाॅझिटीव्ह
खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. परंतु आमचे नेतृत्व करणारा हा कोव्हीड लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा सेवेत हजर होईल, असा विश्वास डाॅ. अभिजित निकम यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments