Daily Mahasatta

Daily Mahasatta

लाॅकडाऊनला विरोध करत कुपवाडात जोरदार निदर्शनेकुपवाड (प्रमोद अथणिकर) : आज बुधवार ७ रोजी कुपवाड मध्ये शासनाच्या मनमानी लॉकडाऊन बाबत कुपवाड व्यापारी संघटनेकडून शासनाच्या निषेधाचे फलक हातामध्ये घेऊन रस्त्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली .

कुपवाड मध्ये आज अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली असून व्यापारी वर्ग जगणार कशावर ? यावरून आज कुपवाड व्यापारी संघटने तर्फे आज आम्ही रस्त्यावर आलो आहे असे म्हणत रस्त्यावरच व्यापाऱ्यांनी निदर्शने करून घोषणा बाजी केली आहे. तसेच व्यापार बंद असल्याने त्यांच्या मुलाचे शिक्षण, घरखर्च ,बँकांचे व्याज तसेच होणारे नुकसान भरपाई कोण देणार यांच्या वर तोडगा शासनाने काढावा. मगच कुपवाड मधील दुकाने बंद करावीत अशी मागणी कुपवाड व्यापारी संघटने तर्फे करण्यात आली. या गोष्टी शासनाने मान्य न केल्यास उद्या थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे, असे कुपवाड व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल कवठेकर यांनी सांगितले आहे

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवल ,उपाध्यक्ष बिरु अस्की, अनिल कवठेकर ,राजेंद्र पवार, रमेश जाधव, निलेश चौगुले, जितू कुंभार, शाम भाट, राजू खोत, अनिल गडदे, सुरज पवार, जगनाथ वाघमोडे, विठ्ठल संकपाळ, सचिन नरदेकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments