Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शिराळा तालुक्यात ४८ तासानंतर कोरोनाचे लसीकरण पुर्ववत

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालय यामध्ये गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजलेपासून लस नसल्याने कोरोना वरील लसीकरण बंद होते. आज सकाळी ११ वाजता लस आल्यानंतर लसीकरण करणे सुरू झाले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी ९५ ते ११० नागरिक लसीकरण करून घेतात. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये देखील आसपासच्या गावातील नागरिक येऊन लसीकरण करून घेतात. गुरुवारी दुपारी १ वाजल्या पासून लस संपल्यामुळे कोरोना वरील लसीकरण थांबवण्यात आले होते.

 सांगली सिव्हील हॉस्पिटलकडून तालुक्यासाठी आज सकाळी २ हजार लसीचा पुरवठा झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय मध्ये लस वाटप सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. दोन दिवस नागरिकांनी सहकार्य केले आहे. कोरोना वरील अँटीजेन व आर.टी.पि.सि.आर. चाचण्या सुरू आहेत. नागरिकांनी त्रास जाणवू लागल्यानंतर दिरंगाई न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी भेट द्यावी आणि योग्य ते औषधोपचार करून घ्यावेत.

Post a comment

0 Comments