Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पेठ मध्ये कडकडीत बंद

पेठ (रियाज मुल्ला)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव पाहता पेठ व पेठ नाका परिसरातील नागरिकांकडून विकेंड लॉकडाऊन कडकडीत बंद ठेऊन पाळण्यात आला.

एन एच 4 हा प्रमुख महामार्ग लगत असणारा पेठ नाका हा परिसर नेहमीच गजबलेला असतो. सांगली , सातारा, कोल्हापूर अन शिराळा भागातून कोकणात जाण्याचा मार्ग पेठ नाक्यावरून जात असल्याने प्रवाशांची रेलचेल असते. आज मात्र कडकडीत बंद मूळे भयान शांतता जाणवत होती. हायवेवर सुद्धा गाड्याची ये जा कमी होती. पेठ व पेठनाका परिसरातील दुकानदारांनी 100 टक्के बंद पाळून उस्फुर्त प्रतिसाद दिला. गावभागात दवाखाने, मेडिकल,आवश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद होती. प्रशासना कडून आवश्यक अशी काळजी घेण्यात आलेली दिसून आली. विशेष म्हणजे कुठे कडक पोलीस बंदोबस्त न्हवता तरी ही स्वयंस्फुरतीने नागरिकांनी काळजी पूर्वक बंद पाळला.

Post a comment

0 Comments