Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात ' माझा प्रभाग माझी जबाबदारी, ' प्रभागातील कुटुंबांना सॅनिटायझरचे वितरण

शिराळा ( विनायक गायकवाड) ; कोरोनासारख्या महामारीला जर हरवायचे असेल तर घरी राहिले पाहिजे, सुरक्षित राहा , मास्क व सॅनिटायझर अवश्य वापरा. शासनाने सुरू केलेली लस अवश्य घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करत शिराळा नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने " माझा प्रभाग माझी जबाबदारी" या शासनाच्या संकल्पनेतून प्रभागातील सर्व कुटुंबांना सॅनिटायझरचे वितरण केले. 

यावेळी शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनीता निकम ,मुख्य अधिकारी योगेश पाटील व नगरसेविका सौ सीमा कदम यांच्या हस्ते प्रभागातील नागरिकांना सॅनिटायझर वितरन करून शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्ष सुनीता निकम म्हणाल्या, संपूर्ण राज्यभर व देशभर कोरोणासारखे महाभयंकर संकट वाढत असताना नगरसेवक बंडा डांगे यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून समाजाला उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबविल्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व नगरपंचायतीचा पदाधिकारी ,नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांना आहे. "माझा प्रभाग माझी जबाबदारी" ही संकल्पना राबवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी आपले प्रभागांमध्ये प्रमुख नागरिकांच्या समिती स्थापन करून नागरिकांची काळजी घेऊन व कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले तर निश्चितपणे कोरोणाला आपण हारवू शकेल. 

मुख्य अधिकारी योगेश पाटील म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या महाभयंकर साखळीला तोंड द्यायचे असेल तर प्रशासनाबरोबरच सर्व नगरसेवकांनी आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. शहरांमध्ये बंडा डांगे यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक होणाऱ्या खर्चाला बगल देऊन प्रभागातील घरोघरी सॅनिटायझर देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. प्रशासना कडून त्यांचे स्वागत असून प्रशासनाला प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहोचणे अवघड होत आहे. यासाठी सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शिराळा शहर कोरोना पासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करणेचे आव्हान पाटील त्यानी केले. 

यावेळी शिवाजी शिंदे, गोरख पवार , औदुंबर मुदगे, सीमा डांगे, अनुसाया जाधव,अरुणा दुबुले, रंजना फुखे, सुवर्णा पाटील, संभाजी गायकवाड,,दर्शन डांगे, अरुण जादव ,माणिक कदम , प्रदीप कदम, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments