Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस मध्ये बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

पलुस (अमर मुल्ला) : कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता सांगली जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापना बंद करणे , तसेच संचारबंदी व जमावबंदी, विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
           
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबूले, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी विशेष पथक तयार केले आहे. विना मास्क फिरणारे व विनाकारण फिरणाऱ्या तब्बल ४२५ नागरिकांकडून १,११,७०० रुपये दंड वसूल केला. तसेच ७६ मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
           
कोरोना काळात   लागू केलेले निर्बंधांचा भंग करणाऱ्या  बांधकाम साहित्य विक्रेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली. पलुस पोलीस हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.तसेच संचारबंदी व जमावबंदी, विनामास्क, विनाकारण फिरणारे नागरिकांच्या वर कारवाई करण्याचे चालू आहे.
           
पोलीस शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चालू असलेले तीन दुकानाची व्यापारी यांना जिल्हाधिकारी यांचेकडून आलेल्या आदेश ची माहिती देऊनही त्यांनी आपली दुकाने चालू ठेवून एकप्रकारे कोरोना रोगाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी विशेष पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
    
दरम्यान न्यु बाॅम्बे स्टील , बाॅम्बे स्टील , शिवशंभो स्टील , पार्वती स्टील , जलाराम ट्रेडर्स अशा पाच दुकानावर  आदेशाचा भंग करून आपली दुकाने चालू ठेवून आपत्ती व्यवस्थापन कोव्डिड उपाययोजनेचे नियम मोडल्यामुळे कलम १८८,२६९ नुसार आपत्ती व्यवस्थापन उपायोजना अर्तंगत गुन्हा दाखल केला आहे. पलूस पोलीस ठाण्यातील कर्मचारी अरविंद कोळी , धनवडे, गिरीष मोरे , रमेश किरपेकर , राकेश भोपळे यांच्या विशेष पथकाने कारवाई केली.

कोणाची गय केली जाणार नाही
कोरोना  साथीच्या संसर्गावर  नियंत्रण ठेवणारे नियमावलींचा जो कोणी भंग करेल त्याची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही .असा सज्जड इशारा सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिला. सर्व नागरिक व आस्थापन यांनी कोरोना संसर्ग काळात पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग, शासनास सहकार्य करून आपण सर्वांनी या महामारी वर विजय मिळवू या असे आव्हान केले.

Post a Comment

0 Comments