Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यात अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यन्वित : आमदार मानसिंगराव नाईक

शिराळा : येथील उप जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे व इतर मान्यवर.

शिराळा (विनायक गायकवाड)
शिराळा तालुक्यातील नागरिकांनां तातडीची उपचार मिळण्यासाठी आजपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त रुग्णवाहिका कार्यन्वित केली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

शिराळा उप जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, शिराळा डोंगराळ तालुका आहे. कांही महत्वाची गावे वगळता वाडी, वस्ती येथील लोक वसलेले आहेत. अलीकडच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने सोई, सुविधा सक्षम केल्या आहेत. शिराळा येथे ५० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय उभारले आहे. तरीही आधुनिक व अत्यावश्यक सुविधेसाठी अजूनही येथील लोकांना सांगली, कोल्हापूर व कऱ्हाड या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रूग्णांना तातडीने शहराकडे अथवा उप जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. माझ्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये किंमतीची या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड इत्यादी सोई आहेत. ती आजपासून रुग्णसेवेत दाखल करण्यात आली आहे.

प्रारंभी वैद्यकीय अधीक्षक जुबेर मोमीन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. वैदयकिय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी रुग्णवाहिकेत असलेल्या विविध सोई-सुविधांची माहिती सांगितली. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैदयकिय अधिकारी डॉ. योगिता माने, डॉ. विनायक धस, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments