Daily Mahasatta

Daily Mahasatta

भगवान महावीर जन्मोत्सवा संबंधी दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने महत्वपूर्ण आवाहन

सांगली (प्रतिनिधी) : वर्तमानकालीन चोवीसावे तीर्थंकर, त्रिशलानंदन भगवान महावीर यांची जयंती, चैत्र शुद्ध त्रयोदशीला दरवर्षी आपण अत्यंत भक्तीभावाने, भव्य प्रमाणात साजरी करतो. या वर्षी ही जयंती, रविवार, दि.25 एप्रिल 2021 रोजी येत आहे.. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या सर्वत्र संचारबंदीही आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे याही वर्षीची 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांची 2620 वी जयंती आपआपल्या स्थानिक पातळीवर मंदिरामध्ये आणि वैयक्तिक स्तरावर घराघरातून साजरी करावी. 

मंदिरामध्ये सकाळी भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेकादी विधी मंदिराचे स्थानिक पंडितांनी करावा. तसेच सायंकाळी आरती करावी. श्रावक श्राविकांनी घरी मूर्ती असल्यास सकाळी अभिषेक, अष्टक करावे, मूर्ती नसल्यास, भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन, अष्टक करावे तसेच जाप द्यावेत. सायंकाळी दारात पाच दीपक लावावेत, आरती करावी. भगवान महावीर जयंती साजरी करताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शांततेत भगवान महावीर यांचा जन्मोत्सवाचा हा मंगल दिन यावर्षी साजरा करावा, असे आवाहन द. भा. जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments