Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. घाटगे हॉस्पिटल व आर आर पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्यालतीने ३० बेड चे कोविड रुग्णालय

सांगली (प्रतिनिधी) : डॉ. घाटगे हॉस्पिटल सांगली व आर आर पाटील होमिओपॅथिक महाविद्यालय , सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ३० बेडच्या कोविड रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी उपस्थित होते. 

प्रमुख पाहुण्या च्या हस्ते कोविड वॉर्ड चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना आयुक्त श्री नितीन कापडणीस व महपौर श्री दिग्विजय सुर्यवंशी यांनी घाटगे हॉस्पिटल चे कौतुक केले व या उपक्रमाला शुभेच्छा व पाठींबा दिला.

डॉ. शरद घाटगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मागील वर्षीचा अनुभव सागितला व उपस्थितांचे आभार मानले. सदर कोविड रुग्णालय हे डॉ. शरद घाटगे ( संस्थापक) , डॉ. रोहिणी घाटगे ( सचिव) , डॉ. अभिजित घाटगे ( ट्रस्टी) व डॉ. निहरिका घाटगे ( ट्रस्टी) यांच्या मार्गदर्शना खाली चालवले जाणार आहे.

या कोविड रुग्णालयात सांगलीतील तज्ज्ञ डॉक्टर्स , घाटगे हॉस्पिटल चे निवासी डॉक्टर्स , महाविद्यालयातील डॉक्टर्स , अनुभवी नर्सेस व विद्यार्थी काम करणार आहेत. या कार्यक्रमाला आर आर पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार भानुसे , महाविद्यालयाचे विद्यार्थी व घाटगे हॉस्पिटल चे स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रंचालन डॉ. पराग बापट ( मेडिकल डायरेक्टर ) यांनी केले.

Post a Comment

0 Comments