Daily Mahasatta

Daily Mahasatta

आज रात्री साडेआठ वाजता लाॅकडाऊनची घोषणा : मंत्री अस्लम शेख

मुंबई (प्रतिनिधी)
राज्यात लाॅकडाऊन करण्याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. आज रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबाबत भूमिका जाहिर करतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना चा विस्फ़ोट सुरु झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत गेल्या काही दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेतल्या. तसेच कोव्हीड टास्क फोर्स सोबत अंतीम चर्चा करुन राज्यात लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु लोकांची गैरसोय होऊ नये, लाॅकडाऊनपूर्वी लोकांना तयारीसाठी वेळ मिळावा अशी मागणी काही नेतेमंडळीनी केली होती. त्यानुसार १४ तारखे नंतर लाॅकडाऊनचा निर्णय होईल असे सांगण्यात आले होते.

मात्र आज मंगळवारी रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या वृत्ताला दुजोरा देत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी, मुख्यमंत्री ठाकरे आजच लाॅकडाऊन बाबत अंतीम घोषणा करतील, असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतात ? लाॅकडाऊन नेमका आठ दिवसाचा की पंधरा दिवसांचा ? प्रवासाला सुट राहणार का ? जिल्हाबंदी होणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान लाॅकडाऊनची चाहुल लागताच मुंबई, पुणेसह मोठ्या शहरातील नागरिकांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आपापल्या गावी जाण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments