Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेकडून मानसशास्त्रीय समुपदेशन सेवा सुरू: आयुक्त कापडणीस

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मानसशास्त्रीय समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

कोरोनाच्या भितीमुळे समाजामध्ये अनावश्यक भिती, दडपण, ताण-तणाव, काळजी, चिंता इ. समस्या अनेक जणांना भेडसावत आहेत. त्यामुळे यातुन त्यांना बाहेर काढण्यासाठी सकारात्मक समुपदेशनाची गरज निर्माण झालेली आहे. महापालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजामध्ये अशा समस्याग्रस्त लोकांसाठी समुपदेशनाची गरज ओळखून, यासाठी शहरामध्ये काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तित्व विकास प्रबोधिनी या संस्थेच्या तज्ञ व अनुभवी मानस तज्ञांद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील लोकांसाठी हा सुत्य व महत्वपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीत काळाची गरज लक्षात घेऊन फोनद्वारे मानसशास्त्रीय समुपदेशन उपक्रम सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ”व“ व्यक्तित्व विकासप्रबोधिनी या नोंदणीकृत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत राबविण्यात येणार आहे.

यासाठी संस्थेच्या तज्ञ व अनुभवी मानसतज्ञांची नावे व मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
श्री.पवनकुमार गायकवाड मो. नं. ९९२२४५३२३५
सौ. पूनम गायकवाड मो. नं. ९४२१११८६६२
सौ.सुनयना बोरकर मो. नं. ९१५८८५६६२२
सौ. रुपाली देशमुख मो. नं. ९७६३६६७४१६ असे आहेत. तरी मनपा क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी तसेच अन्य नागरिकांनी,मानसिक ताण-तणाव, चिंता, काळजी, भिती इत्यादी सारख्या मानसिक समस्या जाणवणाऱ्यांनी महानगरपालिकेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन, मिरज (GPM) येथे DCHC व CCC सेंटर स्थापन करण्यात आले असून सदर ठिकाणी व्यक्तित्व विकास प्रबोधिनी संस्थेच्या तज्ञ व अनुभवी मानसतज्ञांची समक्षात भेट देवून अथवा दररोज सकाळी ९.०० ते सायं. ०७.०० या वेळेत वरील मोबाईल नंबरवर फोन करुन विनामुल्य समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा.  असे आवाहनही  मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments