Daily Mahasatta

Daily Mahasatta

निश्चित ध्येय आणि कठोर मेहनत हा यशाचा मंत्र : माजी आमदार सदाशिव पाटील

विटा : आदर्श कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी रीना गवळी हिचा सत्कार करताना माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील व अन्य.

विटा (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय आणि कठोर मेहनत हा मुलमंत्र आत्मसात केल्यास खात्रीशीरपणे यश मिळते, असे मत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आदर्श कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी रीना गवळी हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये दुसरी येण्याचा बहुमान पटकावला. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की असे मेरिट मधील विद्यार्थी पाहिल्यानंतर या परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हे वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले ते सार्थक झाले असे वाटते आहे. शेवटी त्यांनी रीना गवळी यांना प्रशासकीय सेवेत जाऊन आपले करियर करावे अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष वैभव (दादा) पाटील, किरण (भाऊ) तळेकर, मा. संग्राम देशमुख, कॉलेजचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, इतिहास विषयाचे प्राध्यापक व अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. निवासराव वरेकर, प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे, राहुल घोरपडे, बरकत मुलाणी, राजू कांबळे, अनिकेत गवळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments