Daily Mahasatta

Daily Mahasatta

ठरलं...महाराष्ट्रात लाॅकडाऊन, पण कधी पासून ?

मुंबई (प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. बेड तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे लाॅकडाऊन गरजेचा आहे असे मत टास्क फोर्स च्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. उद्या सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्यानंतर कॅबिनेट बैठक घेऊन १४ तारखेनंतर लाॅकडाऊन बाबत निर्णय जाहीर होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन बाबत व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून टास्क फोर्स सोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शनिवारी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत लाॅकडाऊन अटळ असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं होते. त्यानंतर आज कोवीड टास्क फोर्स सोबत बैठक झाली.

आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून तज्ञांची मते जाणून घेतली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान चौदा दिवसाचा लाॅकडाऊन आवश्यक असल्याचे मत डाॅ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. राज्यात आॅक्सिजन पुरवठा कमी तसेच बेड उपलब्ध नसल्याची चिंता टास्क फोर्स ने व्यक्त केली. मात्र आज कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

बैठकी नंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी ११ वाजता चर्चा लिक्वीड ऑक्सिजन प्लँट निर्मिती, प्रत्येक जिल्ह्यात विद्युत दाहिनी, रेमडेसिव्हर दहा पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरावे लागणार, रेमडेसिव्हर कलेक्टर यांच्या नियंत्रणाखाली आणणे यासारखे महत्त्वाचे निर्णय झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लाॅकडाऊनच्या परिस्थिती बाबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठक घेऊन निर्णय जाहीर करतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या कोव्हीड टास्क फोर्सच्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, डाॅ. तात्याराव लहाने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, डाॅ. संजय ओक, डाॅ. शशांक जोशी, डाॅ. अविनाश सुपे आरोग्य सचिव प्रदिप व्यास यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments