Daily Mahasatta

Daily Mahasatta

स्मशानभूमीतील 'त्या ' कोव्हीड योद्धांना विमा संरक्षण : सभापती सौ प्रतिभाताई चोथे

विटा (प्रतिनिधी) : येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणार्या कर्मचाऱ्यांना विटा नगरपरिषदेच्यावतीने विमा संरक्षण देण्यात आले आहे अशी माहिती महिला व बाल कल्याण सभापती सौ प्रतिभाताई चोथे यांनी दिली आहे.

विटा शहर आणि परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर विट्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नगर परिषदेचे कर्मचारी हे जोखमीचे काम सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर व फवारणी करण्याचे सर्व साहित्य नगरपालिकेच्या वतीने पुरविले जात आहेत. कोरोनाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याचे जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याचा व भविष्याचा विचार करून आम्ही त्या सर्वांचा विमा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. सर्व कर्मचारी हे कठीण काम करताना त्यांचा व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना ही काही सुरक्षा व सुविधा पुरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. नागरिकांनी या लसीकरणास जास्तीत जास्त   प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सभापती सौ प्रतिभाताई चोथे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments