Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात केंद्रीय आरोग्य पथकाची भेट

इस्लामपूर ता.( प्रतिनिधी ) : आज डॉ. प्रणवकुमार वर्मा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाने इस्लामपूर येथे कोविड विषयक कामकाजाची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील, साथ रोड तज्ञ डॉक्टर संतोष पाटील, आरोग्य सहाय्यक नामदेव पवार इत्यादी उपस्थित होते.

येथील दत्त टेकडी कोविड केअर सेंटर , इस्लामपूर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर, आयुर्वेदिक दवाखाना येडेनिपाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर इत्यादी ठिकाणी पथकाने भेट देऊन कोविड कामकाज पाहणी केली. हॉस्पिटल मधील सर्व सुविधा, रुग्णांची सोय, उपलब्ध साहित्य व औषध पुरवठा, कोविड लसीकरणाचे कामकाज, कंटेनमेंट झोन मधील कामकाज इत्यादी गोष्टी पाहून सर्व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ नरसिंह देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉ रानोजी शिंदे उपस्थित होते. तसेच आयुर्वेदिक दवाखाना येडेनिपाणी येथे कोविड लसीकरण कामकाज पाहिले. त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सरपंच डॉ सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ सोमनाथ अंकोलीकर उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर येथे कंटेनमेंट झोन ची पाहणी केली त्या ठिकाणी डॉ दिलीप पाटील ग्राम विकास अधिकारी आनंदराव पवार तलाठी पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments