Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव तालुक्यात अडीच लाखांचा गांजा जप्त, एकास अटक

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे छापा टाकून सुमारे २ लाख ५७ हजार रूपये किमतीचा २५ किलो गांजा पोलीसांनी आज शनिवार ता. १७ रोजी सायंकाळी जप्त केला आहे. याप्रकरणी कडेगाव पोलीसांनी संभाजी सदाशिव जाधव वय-५९ रा. हिंगणगाव खुर्द यास अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, हिंगणगाव खुर्द येथील एका शेतकर्याने आपल्या शेतात वांग्याच्या प्लॉट शेजारी ठिकठिकाणी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार कडेगाव पोलीसांनी आज सायंकाळी या ठिकाणी छापा टाकून सुमारे २ लाख ५७ हजार रूपयांचा गांजा जप्त केला. 

याप्रकरणी शेतमालक संभाजी सदाशिव जाधव वय-५९ रा. हिंगणगाव खुर्द यास अटक करून गुन्हा दाखल
करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी. एस. भोपळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments