Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतच्या आमदारांकडून बेकायदेशीरपणे कर्ज प्रकरण मंजूर : तम्मणगौडा रवी पाटील

"आमदार सावंत याना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर स्वतःच्या पत संस्थेतून असे बेकायदेशीर कर्ज द्यावीत. बँकेचे धोरण एकदा ठरले असेल तर ते बदलता येथेच कसे ? " असा सवाल पाटील यांनी केला आहे.

जत (सोमनिंग कोळी) 
जतचे काँग्रेस आमदार व जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य तामनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. तसेच या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रवी पाटील यांनी केली आहे.

तम्मणगौडा रवी पाटील म्हणाले,जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील दोन शेतकऱ्यांची कर्जासाठी पहिल्यांदा जाडरबोबलाद सोसायटीतून प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हा बँकेने प्रकरण नामंजूर केले होते. मात्र काँग्रेस आमदार सावंत यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून 11 लाख 20 हजाराचे कर्ज प्रकरण मंजूर करुन घेतले. हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे. या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी आम्ही केली आहे.

तसेच आमदार सावंत याना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर स्वतःच्या पत संस्थेतून असे बेकायदेशीर कर्ज द्यावीत. बँकेचे धोरण एकदा ठरले असेल तर ते बदलता येथेच कसे ? असे असेल तर दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्याना सोबत घेवून कर्ज मिळण्यासाठी सांगली जिल्हा बँकेसमोर धडक देवू, असा इशारा तमम्मणगौडा पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments