Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात जुगार अड्ड्यावर छापा, सहाजणांना अटक

कुपवाड (प्रमोदअथणिकर) : कुपवाड येथील दर्गा परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ने छापा टाकून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्डा मालक आयनुदीन अल्लाबक्ष मुजावर याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहिती नुसार कुपवाड परिसरातील दर्गा परिसरात राहणाऱ्या आयनुदीन मुजावर हा त्याचे साथिदारासह त्याचे घरामधील खोलीमध्ये बेकायदेशीरपणे तीन पानी पत्याच्या जुगारावर पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यानंतर पोलीसांनी छापा टाकला असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला माहिती मिळाली असता एका खोलीत सहा इसम गोलाकार बसून तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना दिसले असता त्यांना अटक करण्यात आले आहे .

यामध्ये जुगार अड्डा मालक आयनुदीन अल्लाबक्ष मुजावर वय ५१ रा. इस्लाम मस्जित जवळ कुपवाड , सिंकदंर दस्तगीर जमादार वय-३९ तराळ गल्ली कुपवाड , तैय्यब गफुर जमादार वय-४४ रा नुर इस्लाम मस्जिद जवळ कुपवाड , गौस फरदीन मुजावर वय-२६ रा दर्गाह जवळ कुपवाड , आदम ईलाही समलेवाले वय- ३० रा, माळ भाग सावळी व राजु इकबाल मुजावर वय-४२ रा शांत कॉनली कुपवाड असे सहा जणांना या वेळी अटक करण्यात आले असून त्याच्या कडून रोख रक्कम 10 हजार 800 रुपये व पाच मोबाईल फोन त्याची अंदाजे किंमत 1 लाख असे एकूण 1 लाख 10 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल त्याच्या कडून हस्तगत करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments