Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस तालुक्यात वीकेंड लाॅकडाउनला प्रतिसाद राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा

पलुस (अमर मुल्ला): देशात कोरोना संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे काम प्रशासन करत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आज पलुस येथे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, कोरोना रोगाचा पुन्हा एकदा आपणाला सामना करावा लागत आहे. राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पोलीस ,महसूल विभाग यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यातील लोकांचे लसीकरण जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे . आज पर्यंत दोन्ही तालुक्यातील ४५ वयोगटातील तीस ते पस्तीस टक्के लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. 

कडेगांव व पलुस या दोन्ही तालुक्यात एकूण २३ कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू आहेत. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोणाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी ज्या काही लोकांच्या आरोग्य विषय संरक्षणासाठी संचार बंदी, लॉकडाउन सारखे निर्बंध घातले आहेत. याची कडक अंमलबजावणी करायला हवी. वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम बंद करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लावले आहेत याचे कोणी उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments