Daily Mahasatta

Daily Mahasatta

काँग्रेसच्या जत शहर अध्यक्षपदी भूपेंद्र कांबळे

जत (सोमनिंग कोळी )
जत शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी पालिकेचे अभ्यासू नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष आमदार मोहन शेठ कदम यांच्या हस्ते देण्यात आले. भूपेंद्र कांबळे यांच्या रुपाने जत शहराला एक खमख्या आणि पक्ष वाढीला बळ देणारा अध्यक्ष मिळाला आहे.

जत शहर काँग्रेस अध्यक्ष पदाची जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होती. त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर आमदार विक्रमदादा सावंत व तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार यांनी पालिकेचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्या नावाला पसंती दिली. मंगळवारी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

भूपेंद्र कांबळे हे बहुजन समाज पार्टी तून काँग्रेस पक्षात आले आहेत. आमदार विक्रम सावंत यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून मोठी विकास कामे घेण्यात भरारी घेतली आहे. जत शहर आणि तालुक्याच्या अस्मितेचा विषय असणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. शहरातील पक्ष वाढीला त्यांच्या रुपानी आणखीन बळ मिळणार आहे.

निवडीनंतर बोलताना भूपेंद्र कांबळे म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर प्रत्येक वॉर्डात काँग्रेसची सक्रिय टीम तयार करण्याचे काम आले आहे. जत तालुक्याला आमदार सावंत यांच्या रूपाने कामसू लोकप्रतिनिधी मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वाढीसाठी विधायक कामाला गती देण्यात येणार आहे.
---------------------------

वाढदिवसाचे मिळाले 
असेही गिफ्ट...

नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी यांचा 2 एप्रिल ला वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या अगोदरच काँग्रेसने त्यांच्या फादर काँग्रेसची जबाबदारी देऊन एका लढवय्या व चळवळीतील कार्यकर्त्यांना काम करण्याची नवी संधी दिली आहे, या निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments