Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना : जत शहरात शासकीय आदेशाला कोलदांडा, प्रशासनाचे दुर्लक्ष


जत (सोमनिंग कोळी)
जिल्हाधिकारी सांगली यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर संपूर्ण सांगली जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला असलातरी जत शहरासह तालुक्यात जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडविला जात असून कोरोना बाबत स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने कोरोनाचे संकट कसे दूर होणार अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ. श्री. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाप्रशासनामार्फत संपूर्ण सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे आदेश दिले आहेत. परंतु जत शहरासह तालुक्यात जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडविला जात आहे.

जत शहरात तर वित्तीय संस्थामथ्ये कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. येथिल स्टेट बॅंक ऑफ इंडिया या ठिकाणी तर आज बॅंकेचे ग्राहकानी बॅंकेचे प्रवेश व्दारातच मोठी गर्दी केली होती. या गर्दीत ग्राहकानी कोणत्याही नियमांचे पालन केले नव्हते. लोकानी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तर सामाजिक अंतराचे कोणालाही कसलेच देणेघेणे नव्हते. या गर्दीकडे पाहून असे वाटत होते की, जत शहरात कोरोना नाहीच. अशा पध्दतीने लोकांची वागणूक दिसून येत होती.

जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर भाजी विक्रेते, फळविक्रेते तसेच इतर व्यवसाईक यांच्या तोंडाला मास्क दिसत नव्हते. बाजारपेठेत फिरणारे जत शहरातील नागरिक हेही विनामास्क व सोशल डिस्टन्सिंग चे नियम न पाळता त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते.

जत तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यानी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे पालन करणे अपेक्षित असताना ही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने येत्या काळात जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन जत शहरासह तालुक्याची वाटचाल हाॅटस्पाॅटकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

यापूर्वी जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानंतर जत नगरपरिषदेचे माध्यमातून ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळून आले आहेत त्या परिसरात अग्णीशामक गाडीच्यामाध्यमातून तो परिसर निर्जंतुकीकरण करत होते. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना दिसत होते. परंतु आता पूर्वीच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असलेतरी प्रशासन मात्र जागचे हालत नाही ही वस्तुस्थिती आहे.

जत पोलीस प्रशासन तर कोणत्याही प्रकारे कोरोनाचे नियम न पाळणारेंवर कारवाई करताना दिसत नाहीत. ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने कोरोना जत शहरासह तालुक्यात बळावत चालला आहे.

सध्या जत तालुक्यात १७५ च्यावर कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ११ रूग्ण जत येथिल कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक काॅरंटाईन आहेत. तर १४५ कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण हे होम्आयसोलेशनमध्ये आहेत तर २० रूग्ण हे मिरज व सांगली येथील रूग्णालयात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत जत तालुक्यातील एकूण ७७ कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण हे मृत्यु पावले आहेत.

जत तालुक्यातील बिळूर, आवंढी व काशिलिंगवाडी ही गावे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाली आहेत. जत शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या रूग्णांची संख्या विचारात घेता जत शहर हे लवकरच कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही.

जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंधाबरोबरच दंडात्मक कारवाई सुरू करावी व जत शहरासह तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात व आरोग्य व आरोग्य उपकेंद्रात आवश्यक ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटरची व्यवस्था करावी व कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments