Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा, वाळवा तालुक्यात रेमडीसीवीरचा तुटवडा, नातेवाईकांची धावपळ

 इस्लामपूर (हैबत पाटील) : शिराळा वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शन चा अनेक ठिकाणी तुटवडा भासतो आहे. रुग्ण औषधाविना व्हेंटिलेटर वर आहेत. तर रुग्णाच्या नातेवाईकांची औषध मिळवण्यासाठी धावपळ होताना दिसते आहे. 

शिराळा, वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी खचाखच भरले आहेत. पण रुग्णावर इलाज करण्यासाठी ज्या महत्वाच्या औषधांची गरज आहे त्या औषधाचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. काही हॉस्पिटल मध्ये या औषधांचा तुटवडा असल्या कारणाने रुग्णांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची पण धावपळ होताना दिसते आहे ज्यास्त पैसे देऊन सुद्धा औषध मिळते का याचा पण नातेवाईक प्रयत्न करताना दिसतात पण ते उपलब्ध होत नाही . त्यातच काही रुग्ण दगावत आहेत. आठ आठ दिवस काही रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन त्यांना रेमडीसीवीर औषध उपलब्ध होत नाही ही चिंतेची बाब आहे. 

रेमडीसीवीर ला पण जिल्हा बंदी ! 
बेफाम रकमेची मागणी करत खिसा भरणाऱ्याना व काळाबाजार रोखण्यासाठी रेमडीसीवीर औषधाला जिल्हा बंदी करण्यात आलेली जरी असली तरी ज्या जिल्ह्यात जास्त साठा आहे तिथून जिथे या इंजेक्शन ची कमतरता आहे व खरोखर जिथे गरज आहे तिथे देण्याची व्यवस्था झाली तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होईल .सध्या इस्लामपूर मध्ये 35 ते 50 बेड असणाऱ्या हॉस्पिटल ना फक्त पाच व्हाईल पुरवल्या जातात व एक पेशंट ला गरज सहा व्हाईल ची असते .या मध्ये पुरवठा कमी असल्याने डॉकटर काहीच करू शकत नाहीत. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार उठला आहे. या मध्ये रुग्णांच्या नातेवाईक व संबंधित लोक पळापळ करून रेमडीसीवीर मिळवण्यासाठी जीवाचे रान करताना दिसतात . तर रुग्ण व्हेंटिलेटर वर भरोसा ठेऊन कोरोनाशी निकराने लढत असतात अशी गंभीर स्थिती आहे .

Post a Comment

0 Comments