Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्याना महापालिकेचा झटका

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मॅार्निंग वॅाकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची रॅपिड ॲंटीजेन टेस्टींग सुरू करण्यात आली आहे. या नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः आरोग्य यंत्रणेकडून ही कारवाई सुरू केली आहे.

बुधवारी सकाळी महापालिकेने मल्टीफ्लेक्स परिसरात मॉर्निग वॉक साठी फिरणाऱ्या 60 नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली. यामध्ये काही तरुण, वृद्ध, महिला यांचा समावेश होता. एकूण 60 जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट यावेळी करण्यात आली. यामध्ये एका वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः उभे राहून या सर्वांच्या अँटीजन टेस्ट करून घेतल्या. यामध्ये सहायक आरोग्यधिकारी डॉ वैभव पाटील, डॉ वर्षा पाटील आणि डॉ अक्षय पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे आणि शहर पोलिसांची टीम या कारवाईत सहभागी झाली होती. 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर आणि विनाकारण फिरणाऱ्याची अशी रॅपिड तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही रस्त्यावर फिरू नये असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments