Daily Mahasatta

Daily Mahasatta

पृथ्वीराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सांगली (प्रतिनिधी) : महापालिकेच्या आरोग्य विभागात कोविड - १९ या साथरोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी  आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून बी.एच.एम.एस. डॉक्टरांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याची प्रक्रिया सांगली, मिरज, कुपवाड शहर  महानगरपालिकेने सुरू केली आहे. या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांच्याकडे केली होती.

श्री. पृथ्वीराज पाटील यांनी श्री. कापडणीस यांची नुकतीच भेट घेतली होती. सध्या सुरू असलेल्या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे  महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा आयुष मार्फत समावेश केल्याचे समजल्यानंतर त्या ठिकाणी बी.एच.एम.एस. डॉक्टरांचीही नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली होती. बृहन्मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि इतर महानगरपालिकांनी बी.एच.एम.एस. डॉक्टरांना सामावून घेतलेले आहे, हेही त्यांनी आयुक्तांना पटवून दिले होते.

त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस. डॉक्टरांच्या बरोबरच बी.एच.एम.एस. डॉक्टरांचाही समावेश केला आहे. कोविडमध्ये गेल्या वर्षी या डॉक्टरांनी चांगले काम केले आहे.

बी.एच.एम.एस. डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त श्री. कापडणीस यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments