Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात कोरोना चाचणी केंद्र सुरू करा : गजानन मगदूम

कुपवाड (गजानन मगदूम) : सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कुपवाड शहरामध्ये कोरोना या महाभयंकर रोगाचे रुग्ण प्रंचड प्रमाणात वाढत असल्याने कुपवाड शहरामध्ये महापालिकेचे अॅलिओपॅथीक दवाखान्यात सध्या लसीकरण सुरु आहे. त्यासाठी नागरिकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे .रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने कुपवाड मध्ये अँटिजेन टेस्ट केंद्र असणे गरजेचे आहे.

यामुळे कोरोनाची लक्षणे ज्यांना दिसत असल्यास त्याच्या कुटुंबामधील कोरोना पोझीटिव्ह रिपोर्ट आलेनंतर त्यांच्या नातेवाईकांची टेस्ट करणेसाठी कुपवाड शहरात सध्या कोणतीही सोय नाही त्यामुळे सदरचे रुग्ण इतरत्र फिरल्याने त्यांचा प्रसार होत आहे. त्यामुळे तातडीने अेन्टींजन टेस्ट सुरु करुन संबधित यंत्रणेला कर्मचारी पुरविण्यासाठी नगरसेवक गजानन मगदूम यांनी निवेदन जिल्हाधिकारी व आयुक्तांना देणेत आले आहे, अशी माहिती नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments