Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाच्या भीषण संकटात विनोदभाऊ युवा मंचचा उपक्रम कौतुकास्पद : आ. बाबर

विटा (प्रतिनिधी) : करोनाच्या भीषण संकटात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता विनोदभाऊ युवा मंचने सामाजिक जाणीवेने केलेला रक्तदान शिबिराच्या आयोजनाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी व्यक्त केले.

आज मॉडर्न एजुकेशन सोसायटीच्या स्वर्गीय चिन्तामणी कोन्डोपत गुळवणी शैक्षणिक संकुलात झालेल्या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने आपत्कालिन परिस्थितीत सामाजिक उत्तरादायित्व जाणून विनोदभाऊ युवा मंचने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. उद्घाटन प्रसंगी मा. विनोद गुळवणी, मा. डी. के. कदम, मा. जयदेव बर्वे, मा. भैय्या शहा, मा. सुभाष नेवासकर, मा. सुनिल गुळवणी, मयुरेश गुळवणी, गौरव गुळवणी, निरंजन गुळवणी, नितीन शेलार, विशाल बिसुरकर, वैभव शेलार, काशिनाथ कुलकर्णी, सोहेल मुजावर, गणेश माळी, अक्षय कुळकर्णी, संतोष माने इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पस्तीस बाटल्या रक्त संकलन झाले.

Post a Comment

0 Comments