Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात धोक्याची घंटा, एकाच दिवशी १२ पाॅझिटीव्ह


विटा (प्रतिनिधी)
विटा शहरात कोरोनाची धोक्याची घंटा वाजली असून सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. आज गुरुवारी ता. १ रोजी एकाच दिवशी विटा शहरात १२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच संपूर्ण खानापूर तालुक्यात २४ रुग्ण आढळून आले आहेत.

विटा शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज विटा शहरात १२ रुग्ण आढळून आले आहेत. भाळवणी गावात देखील ६ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मंगरूळ -३, कळंबी-१, भूड-१, लेंगरे-१ असे तालुक्यात एकूण २४ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 2 हजार ८९१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ हजार ६५३ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोना ने ७३ जणांचा बळी घेतला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात १६५ इतके रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments