Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील प्रा. सुजाता माळवी सेट परीक्षा उत्तीर्ण

विटा (प्रतिनिधी) : वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून निवड होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आवश्यक केलेली सेट परीक्षा प्राध्यापिका सुजाता नामदेव माळवी उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे सायन्स विभागात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या माळवी यांनी केमिकल सायन्स या विषयातून सेटची परीक्षा दिली होती. अत्यंत कठीण असणाऱ्या या परीक्षेचा निकाल 6 टक्के लागला.

जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथून बी. एस्सी. पदवी तर बळवंत कॉलेजमधून त्यांनी एम. एस्सी चे शिक्षण पुर्ण केले आहे. तसेच जयवंतराव आवळे कॉलेज मधून शिक्षणशास्त्र पदवी घेतली आहे. 

त्यांच्या यशा बद्दल लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मा. सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष मा. वैभव (दादा) पाटील, कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, उच्च माध्यमिकचे प्राचार्य मा. डी. बी. कुंभार व उच्च माध्यमिकचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे पती डॉ. एम. बी. निकाळजे व दीर प्रा. डॉ. एस. बी. निकाळजे, आदर्श कॉलेजचे प्रा. डॉ. बी. एन. कर्पे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments